बिनशेती (अकृषिक) ना हरकत दाखला देणे
(रहिवास/ वाणिज्य/ औद्योगिक)
नियमावली: शासन निर्णय क्रमांक आर बी डी/1081/871/ रस्ते-7/ दिनांक 09/03/2009
१. आवश्यक कागदपत्रे
- प्रांत अधिकारी यांचे पत्र (रहिवास/ वाणिज्य/ औद्योगिक)
- ७/१२ उतारा (३ महिन्याच्या आतील तारखेचा)
- गाव नकाशा: गट नंबर/सर्वे नंबर दर्शविलेला (रंगाने दर्शविण्यात यावा)
- तालुका भूमापन अधिकारी यांचा मोजणी नकाशा
- ले-आऊट प्लॅन: यावर आर्किटेक्ट आणि जमीन मालक यांच्या स्वाक्षऱ्या अनिवार्य.
- ७/१२ उताऱ्यावर एकापेक्षा अधिक नावे असल्यास:
- संमती पत्र
- टीएलआर (TLR) नकाशावर सर्वांच्या स्वाक्षऱ्या
- उपअभियंता यांची सही
२. कार्यपद्धती
- कागदपत्रांची पूर्तता झालेली असल्यास प्रकरण त्वरित उपविभागाकडे पाठवावे.
- कागदपत्रे अपूर्ण असल्यास, प्रकरण मूळ प्रतीसह संबंधित अर्जदाराकडे त्रुटी पूर्ततेसाठी परत पाठवावे आणि कार्य विवरण नोंदवहीमध्ये त्याची नोंद घ्यावी.
- विभागीय स्तरावरील तपासणी:
- रस्त्याच्या मध्यापासून जागेचे अंतर स्केल (Scale) प्रमाणे तपासावे.
- नकाशावर उपअभियंता यांचा शेरा आणि अंतरे दर्शवून त्यांची स्वाक्षरी असावी.
- ना हरकत दाखला देण्याबाबतचा स्पष्ट खुलासा पत्रात नमूद असावा.
- कार्यकारी अभियंता यांच्या दौऱ्याच्या वेळी प्रत्यक्ष जागेची (गट/सर्वे नंबर) खातरजमा केलेली असावी.
- सर्व बाबींची पूर्तता झाल्यावर अंतिम मंजुरीसाठी सादर करावे.
- नकाशावर "Only for N.A." असा शिक्का मारण्यात यावा.
- अहवाल प्राप्त झाल्यावर प्रकरण नस्तीबद्ध (File) करून नोंदवहीत नोंद घ्यावी.
0 Comments
If you have any doubts, suggestions , corrections etc. let me know